



























व्यक्तिगत सांस्कृतिक सेवा
माझं नाव एस जी नायक आहे आणि मी एक कलाकार आहे. माझे परिश्रम, अनुभव, प्रयोग आणि संशोधन यांनी
माझे सांस्कृतिक गुण घडवले आहेत. मी गुणवत्ता, वक्तशीरपणा आणि जबाबदारीने माझ्या सेवा प्रदान करतो.

निवेदन / सूत्रसंचालन
अँकरिंग, कम्पेअरिंग, शो होस्ट करणं हे कलात्मक जबाबदारीचं काम आहे. अँकरिंग साठी प्रयत्न, अनुभव आणि सह-अनुभूतीची क्षमता लागते
तुम्ही तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अँकरिंग करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता.

प्रोफेशनल सुगम गायन
माझ्या हृदयातील आनंद श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी मी गातो.
हिंदी आणि मराठीसोबतच मी भारतीय संगीताच्या म्हणजेच शास्त्रीय, उप शास्त्रीय आणि भारतीय सुगम संगीत तिन्ही प्रकारांमध्ये गायन करतो.. सर्वोत्तम गाण्याच्या सादरीकरणासाठी तुम्ही मला संपर्क साधू शकता.

हार्मोनियम साथ संगत
मी हार्मोनियम साथीदार म्हणून चांगला आहे.
माझा असा विश्वास आहे की साथ संगत ही गायन किंवा वाद्य कौशल्य सादर करताना एकमेकांशी सुसंवाद साधण्यासाठी असते.
सर्वोत्तम हार्मोनियम साथीकरता तुम्ही मला संपर्क साधू शकता.
* प्रदर्शित मानधन रकमा फक्त नाशिक शहर क्षेत्रासाठीच्या आरंभ रकमा आहेत.
कार्यक्रमाचे प्रकार, कालावधी, ठिकाणे, आवश्यकता, कलाकार, सामग्री आणि प्रसंग यानुसार मानधनाची रक्कम बदलू शकते.